माळी सेवा संघ अध्यक्ष दत्ता भाऊ माळी यांचं पेनुर नगरीमध्ये जल्लोष मध्ये स्वागत.


संघर्ष केल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही:  दत्ता भाऊ माळी
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
 प्रतिनिधी: नानासाहेब ननवरे 

 माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकारी यांचा सोलापूर दौरा ओबीसी आरक्षण विषयी चर्चा संदर्भात प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या पदाधिकारी व समाज बांधवाशी भेटीगाठी प्रथम सोलापूर जिल्ह्यातील संत शिरोमणी सावता महाराज आरण येथील समाधी सोहळ्याचे दर्शन घेऊन माढा मोहोळ पेनुर पंढरपूर सांगोला आणि माळशिरस समाजबांधवांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधवांकडून प्रतिसाद मिळाला
[]
ओबीसी आरक्षणासाठीचा एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधित एम्पिरिकल डेटा गोळा झाला नाही तर ऑक्टोबर २०२१ मध्ये नागपूर, धुळे, नंदुरबार, वाशीम, अकोला जिल्ह्य़ातील निवडणूकांप्रमाणे ज्याप्रमाणे ओबीसी आरक्षणाविनाच पार पडल्या. त्याप्रमाणे राज्यातील पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका आदी स्वराज्य संस्थांमधील होणाऱ्या निवडणुकांत ओबीसीना आरक्षणापासून वंचित रहावे लागेल. यामुळेच राज्य सरकारच्या ओबीसी आरक्षणाविरोधात रत्नागिरीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओ.बी.सी आरक्षणाचे मोर्चे बांधणीसाठी महाराष्ट्र भर दौरे करून समाजाच्या मत जाणून घेणार असल्याचे पेनुर येथील बैठकीत अध्यक्ष दत्ता भाऊ माळी, अॅड नितीन राजगुरू बोलत होते , प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मोर्चे काढु  बैठकीत चर्चा झाली. प्रदेश कार्यकारिणी यावेळी अॅड नितीनजी राजगुरू, ज्ञानदेव जाधव ,बालाजी वहील, नानासाहेब ननवरे, नामदेव होले , सोलापूर जिल्हा संघटक पोपट गायकवाड, कार्याध्यक्ष बापूसाहेब गवळी, तालुकाध्यक्ष राहुल वसेकर, युवा तालुकाध्यक्ष अतुल ननवरे,व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न