भरधाव ट्रकने ७ वर्षीय चिमुकलीला चिरडले

भरधाव ट्रकने ७ वर्षीय चिमुकलीला चिरडले

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
 पांढरकवडा-  राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील केळापूर येथे एका भरधाव ट्रकने रस्ता ओलांडत असलेल्या एका ७ वर्षीय चिमुकलीला उडविल्याची घटना गुरुवारी १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडली. उपचारा दरम्यान घटनेत जखमी आयुषा पवन रेड्डी (७) वर्ष या  चिमुकलीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

.प्राप्त माहतीनुसार पांढरकवडा येथील चंद्रशेखर वार्डातील रेड्डी परिवारातील काही व्यक्ती केळापूर येथे जगदंबा देवस्थानात दर्शन करण्याकरिता आले होते. दुपारी २ वाजता ते पांढरकवडा परत जाण्याकरिता केळापूर बसस्थानकावर आले असता रोड क्रॉस करते वेळी आयुषाला आदिलाबाद वरून नागपूर कडे जात असलेल्या भरधाव ट्रक क्र. एन.एल. ०१ एसी ८९९२ ने  जोरदार धडक दिली. या धडकेत आयुषा गंभीर जखमी झाली तिला तत्काळ पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान धडक देऊन पळुन जात असलेल्या ट्रकचा केळापूर येथील युवकांनी पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केल पोलिसांनी ट्रक चालकावर कलम २७९,३०४(अ )
अंतर्गत गुन्हा नोंद करून पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात मारोती पाटील करीत आहे राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील केळापूर येथे आज झालेल्या घटनेत एका निरपराध चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न