बार्शी येथिल महाराष्ट्र विद्यालयात पत्रकारांचा सत्कार

महाराष्ट्र विद्यालयात पत्रकारांचा सत्कार

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
बार्शी प्रतिनिधी दत्ता सुरवसे 

 दिनांक १५  रोजी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी व महाराष्ट्र विद्यालय बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
प्रथम पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अजित कुंकूलोळ व सर्व पत्रकार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज  व डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी अजित कुंकूलोळ,शहाजी फुरडे, बी. के. गव्हाणे, गणेश गोडसे, सचिन अपसिंगकर ,संतोष सुर्यवंशी, विजय निलाखे,संजय बारबोले, नितीन भोसले, चंद्रकांत करडे,गणेश भोळे, मल्लिकार्जुन धारूरकर,अजय पाटील, गणेश घोलप, कादीर बागवान,अरूण बळप, दत्ता सुरवसे, दिनेश मेटकरी, उमेश पवार,विनोद ननवरे,महादेव वाघ, बालाजी विधाते या सर्व पत्रकारांचा सत्कार समारंभ संस्थेचे सचिव पी.टी पाटील यांचे हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात सचिन अपसिंगकर, बी.के. गव्हाणे,अजित कुंकूलोळ या पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त केली.त्यानंतर संस्थेचे सचिव पी.टी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेतील कामाचा आढावा थोडक्यात पत्रकारांसमोर सादर केला.पुढे कार्यक्रमात महाराष्ट्र विद्यालयातील सहशिक्षक आनंद कसबे यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती ,पुणे यांच्या भूगोल स्वाध्यायपुस्तिका समीक्षण समिती वर निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव पी.टी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोबत विद्यालयाचे प्राचार्य जी.ए. चव्हाण उपप्राचार्य एल.डी.काळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किरण गाढवे यांनी तर आभार प्रदर्शन के.जी.मदने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न