दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुका अध्यक्ष नितीन माने यांच्यासह तिघांचा विजय.
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात हजंगी नगरपंचायत च्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे तीन उमेदवार निवडून आले. जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी अपंग क्रांती जिल्हाध्यक्ष संजीवनीताई बारंगुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली.
अत्यंत गाजलेल्या या निवडणुकीत प्रहारचे नितीन माने,283 मताने,कमल नागनाथ वाघमोडे 277 मताने,चैताली भीमराव शिंगे बिनविरोध निवडून आले.
या संपूर्ण यशात प्रहार अक्कलकोटचे शहराध्यक्ष अमर शिरसाट,तालुकाध्यक्ष नितीन माने,युवा जिल्हा सरचिटणीस विजय माने पिरप्पा फुलारी,गोटू माने अमोल पाटील सुशांत निंबाळकर,फातिमा बेग स्वामीनाथ धनशेट्टी सिद्धाराम बंडगर वाईट पठाण विनीत शिंदे संतोष बनसोडे यांच्यासह अनेक प्रहार कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःला झोकून देऊन प्रचार करत प्रहार चे विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम केले.
सोलापूर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना अपंग क्रांती आंदोलन सर्वांच्या वतीने विजयी उमेदवारांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
Comments
Post a Comment