सेल्फी काढन्याच्या नादात बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) केळापुर पाटणबोरी पैनगंगा नदीच्या तीरावरील पेंडलवाडा (तालुका जैनथ) जिल्हा आदिलाबाद तेलंगाना येथील रहिवासी असलेला निहांत कार्तिकरेड्डी मुस्कावार हा बालक वय 10 वर्ष पैनगंगा नदीवर परिवारा सोबत आला असता सेल्फी फोटो घेत असताना नदीच्या पाण्यात बुडुन त्याचा करुण अंत झाला.
दरवर्षी पौष वैद्य द्वितीयेला यात्रेनिमित्त परिसरातील नागरिक गंगा नदीला पुजा करुन नवेद्य दाखवून प्रसाद घेतात पेंडलवाडा येथील मुस्कावार परिवार पूजा करुन नवेद्य दाखवण्याकरिता आला होता . परिवारातील निहांत खेळत खेळत सेल्फी काढायला 20 जानेवारी दुपारी दोन वाजता गंगेच्या पाण्यात उतरला मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरुन खोल पाण्यात तोल जाऊन तो बुडाला. जवळच असलेल्या नागरिकांना सदर बाब लक्षात आली त्यांनी निहांतला पाण्याबाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र निहांतने दम सोडला. नीहांत आई_वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. तो आदिलाबाद येथील आर्यभट्ट स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Comments
Post a Comment