काक्रंबावाडी येथे करण्यात आले स्मार्ट मतदानकार्ड चे वाटप..


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

  तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथे करण्यात स्मार्ट मतदानकार्ड चे वाटप. मतदान हा आपल्याला दिलेला संविधानाने सर्वात महत्वाचा हक्क असून ती एक आपली जबाबदारी सुद्धा आहे. आज भारतातील प्रत्येक व्यक्तीला मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आणि आपला हक्क बजावण्यासाठी या महत्वपूर्ण अशा मतदानकार्ड ची आवश्यकता असते. 
         या आधुनिक युगात हळूहळू मतदान कार्ड चे ही स्वरूप बदलत चालले आहे. मतदानकार्ड हे डिजिटल स्वरूपात मिळत आहेत. यालाच आपण स्मार्ट मतदान कार्ड असेही म्हणतो. याच मतदान कार्ड चा सर्वाना उपयोग होण्यासाठी भारत सरकारच्या निवडणूक आयोगाकडून हे कार्ड वाटप करण्यात येते. 
            आज या मतदान कार्ड चे काक्रंबावाडी येथे नागरिकांना वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित जि. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक . जेठीथोर सर, सहशिक्षक गुरव सर तसेच काक्रंबावाडी येथील मल्हार आर्मी युवक तालुका उपाध्यक्ष  महेश बजरंग कोळेकर आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न