सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एकशिव गावात प्रहार जनशक्ती पक्ष शाखेचे उद्घाटन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
दिनांक 09रविवार रोजी लोकनायक आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या अगदी बॉण्ड्री वर असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील एकशिव गावात शेकडो तरुणांनी प्रवेश करत गावात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटने च्या शाखेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात केले.
यावेळी सोलापूर जिल्हा प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी शहर संपर्क प्रमुख जमीर भाई शेख शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील,महेश शिंगाडे माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख जानकर संपर्कप्रमुख शहाजी देशमुख युवा उपाध्यक्ष युनूस पठाण मल्लिनाथ शिंगाडे प्रथमेश काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले की माळशिरस तालुक्यात गेल्या काही वर्षापासून जिल्ह्याच्या तुलनेत प्रहार वाढीचा वेग कमी होता आणि याचे कारण या तालुक्यात असणारी दडपशाही हे होते परंतु ज्या प्रकारे गेल्या एक वर्षापासून अनेक तरुण या तालुक्यातील दडपशाहीला आणि अन्यायाला झुगारून देत प्रहार मध्ये दाखल होत आहे त्यामुळे येत्या वर्षभराच्या काळात माळशिरस तालुक्याच्या घराघरात प्रहार पोहोचलेलं असेल आणि वंदनीय लोकनायक बच्चुभाऊ यांची सेवा त्याग समर्पण संघर्ष ही विचारप्रणाली घेऊन माळशिरस तालुक्यातील सर्व पदाधिकारी लोकांसाठी काम करतील.. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment