ढोकी शिवारातील टेंभी नाल्याच्या काठी एका अनोळखी ईसमाचा गळफास लावून आत्महत्या
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) केळापुर तालुक्यातील ढोकी शिवारातील टेंभी नामक नाल्याच्या काठी झाडाला गळफास लावलेला एक अज्ञात मृतदेह आढळुन आला.
ढोकी येथील पोलिस पाटिल सौ.स्वेता जगदीश येमुलवार यांना दिनांक. २५/१/२०२२ रोजी. सकाळी ९ च्या दरम्यान गावकऱ्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली असता त्यांनी त्वरित या घटनेची माहिती पांढरकवडा पोलिस अधिकाऱ्यांना दिली माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले आणि चौकशी चालू केली मिळालेल्या माहिती नुसार एसमाची अंदाजे वय (३५) वर्ष असून त्याने अंगावर पिवळ्या हिरव्या रंगाचे पट्टेदार हाप टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा प्यांट घातलेला असता ईसमाने ३-४ दिवसा आदी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी दर्शविला शरीर अतिशय कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे इसमाची ओळख करता आली नाही तरी पुढील तपास पोलिस निरीक्षक बारिंगे साहेब (पांढरकवडा) यांच्या निरीक्षणाखाली सुरु आहे.
Comments
Post a Comment