अंगणवाडी व गरोदर मातांना दिला जाणारा पोषक आहार निकृष्ट दर्जाचा. धान्य बंद करून लाभार्थीना रक्कम देन्याची प्रहारच्या वतीने मागणी
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
एकात्मिक बालविकास योजना या प्रकल्पा अंतर्गत जिल्हा परिषद सोलापूर कडून अंगणवाडी मार्फत गरोदर माता, स्तनदा माता व 6 महिने ते 6 वर्षांपर्यंतच्या बालकांना दिला जाणारा पूरक पोषक आहार अंगणवाडी केंद्रामार्फत महिन्यातून किमान 25 दिवस व वर्षातील किमान 300 दिवस देण्यात येतो. या दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील सर्व वस्तू (मीठ, डाळ, गहू, तांदूळ , चटणी,हळद ई.) ह्या अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.
परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खडे, माती व तत्सम घटकाची भेसळ असल्याचे दिसून येते आहे.त्यामुळे लाभार्ध्याचे पोषण होण्याऐवजी यातून वेगवेगळे आजार, मुतखड्याचे विकार होण्याची शक्यता जास्त आहे. सदर चा आहार हा खाण्यालायक नसल्याचे दिसून येत असल्याने जनावरांना देत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या योजनेचा हेतू सफल होत नाही.त्यामुळे या सर्व गोष्टीं चा विचार करून आम्ही आपणास विनंती करतो की सदर योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या वस्तूंचा पुरवठा बंद करावा आणि त्या ऐवजी त्या वस्तूचे पैसे त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे. असे निवेदन गट विकास अधिकारी यांना प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने देण्यात आले. जर लवकरच त्या बाबत योग्य निर्णय न झाल्यास प्रहार शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी म्हटले आहे. त्याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष रमेश जी पाटील, तालुका अध्यक्ष अमोल केसरे, तालुका कार्याध्यक्ष संतोष कवले, विद्यार्थी तालुका अध्यक्ष प्रवीण लोकरे, बाळासाहेब जाधव उपस्थित होते.*
Comments
Post a Comment