संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडा : अतुल खुपसे-पाटील
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
विरोधी पक्ष जेव्हा सत्तेच्या बाहेर असतो तेव्हा शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता दाखवतो, पण एकदा का सत्तेत गेला की शेतकऱ्यांबद्दल असणारी आत्मीयता नाहीशी होती आणि सत्तेच्या खुर्च्या उबवण्याचा आनंद घेतात. त्यामुळे जगाचा अन्नदाता कमजोर होतो. त्याला कोणीच आधार देत नाही. आणि तो आपल्या सारख्या संघटनेकडे आशेने पाहतो. त्यामुळे सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी तळमळीने काम करा असे आवाहन जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी केले.
करमाळा शासकीय विश्राम गृह येथे जनशक्ती संघटनेची बैठक पार पडली. यावेळी संघटनेच्या पद नियुक्त्या देण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी वारकरी संप्रदाय महाराष्ट्र प्रमुख अविनाश महाराज कोडलिंगे, उपजिल्हाप्रमुख अतुल राऊत, करमाळा उपतालुकाप्रमुख वैभव मस्के, पांडूरंग भोसले, शरद एकाड, विद्यार्थी करमाळा तालुका प्रमुख रामराजे डोलारे, विद्यार्थी तालुका कार्याध्यक्ष, किशोर शिंदे, करमाळा महिला तालुका उपप्रमुख कोमल खाटमोडे, करमाळा सोशल मीडिया प्रमुख सागर शिंदे, तालुका युवा आघाडी कार्याध्यक्ष अजीज सय्यद, तालुका सरचिटणीस प्रदीप शिंदे आदी निवडी करण्यात आल्या.
या निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व संघटनेची शपथ देण्यात आली.
Comments
Post a Comment