बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
दिनांक ३ जानेवारी
बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये महिलांविषयक कायद्याबाबत माहिती देण्याकरिता एडवोकेट अश्विनी नाईनवार मॅडम आणि अडवोकेट सीमा गुंडावार मॅडम यांना पाचारण करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक रेळे सर उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये प्राध्यापिका डॉक्टर चौधरी मॅडम यांनी सावित्रीबाई विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रविण कनाके सर यांनी केले. महिलांविषयक कौटुंबिक हिंसाचार कायदा बाबत एडवोकेट नाईनवार यांनी विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली व एडवोकेट गुंडावार मॅडम यांनी बेटी बचाव संदर्भामध्ये गर्भलिंग निदान हे कसे कायदेविषयक कायद्या विरोधी असून त्याबाबत कायद्यात काय तरतुदी आहेत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सत्तूरवार सर यांनी केले. या कार्यक्रमात काही विद्यार्थी व विद्यार्थिनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीकॉम भाग एक ची विद्यार्थिनी कुमारी किरण राठोड तिने केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉक्टर रंजना महाजन आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment