पोलीस जाणीव सेवा संघ काक्रंबावाडी यांच्या वतीने राबविण्यात आला एक अनोखा उपक्रम..


तुळजापूर:- दिनांक ५ जानेवारी २०२२ रोजी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथे पोलीस जाणीव सेवा संघ तुळजापूर सदस्य महेश बजरंग कोळेकर यांच्या प्रमुख मार्गदनाखाली आणि नेतृत्वाखाली जि. प. प्रा. शाळा काक्रंबावाडी येथे वही आणि पेन वाटप करण्यात आले. 
         शाळेतील गरीब गरजू , होतकरू मुलामुलींना या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम राबवित असताना पोलीस जाणीव सेवा संघ चे संस्थापक अध्यक्ष रवि फडणीस सर तसेच तुळजापूर तालुकाध्यक्ष किरण मरडे, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष तिरुपती तेलंग यांचे मार्गदर्शन लाभले.
         पोलीस जाणीव सेवा संघ मार्फत हा अनोखा उपक्रम काक्रंबावाडी या गावात पार पाडण्यात आला. यावेळी पोलीस जाणीव सेवा संघ चे तुळजापूर तालुक्यातील महेश बजरंग कोळेकर, किशोर ठवरे, सचिन चव्हाण, अजय चंदनशिवे, रोहित भिसे, सौरभ भिसे, अजय पांडगळे, किरण ठवरे हे प्रमुख सदस्य आणि काक्रंबावाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न