जनशक्ती' संघटनेचा करमाळ्यात जनता दरबार..

'जनशक्ती' संघटनेचा  करमाळ्यात जनता दरबार..

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे 

   करमाळा तहसील आवारात जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी जनता दरबार आयोजित केला होता. यामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून खराब झालेल्या कोर्टि - आवाटी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला असून लवकरच या रस्त्याची दुरुस्ती करणार असल्याचे आश्वासन बांधकाम विभागाने दिले. पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या ऊसतोडणी चा प्रश्न. सावडी, कोर्टि, कुंभरगाव या गावातील शेतकऱ्यांच्या ॲडिशनल रोहित्र, सावडी गावातील मुस्लिम समाजाचे कब्रस्तान, उंदरगाव -पोफळज जे काम चालू आहे त्या रस्त्यावरील पुलाच्या  कामामुळे काही शेतकऱ्यांना अडचण निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहे. त्यामुळे तेथील शेती पिकं उध्वस्त होत आहे त्यामुळं तो पूल उंदरगाव येथे न बांधता पुढे बांधावा अशी मागणी बांधकाम विभागाला केली. शिवाय दवाखान्याची लागणारी आवश्यक कागदपत्रे, अनेकांच्या रेशन कार्ड च्या अडचणी, वेगवेगळ्या दाखल्यांच्या तक्रारी, अनेकांच्या आधार कार्डवर होणाऱ्या चुका अशा अनेक अडचणींवर अतुल खुपसे यांनी मार्ग काढला त्यामुळे समस्या व अडचणी घेऊन आलेल्या करमाळा तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

यावेळी रोहन नाईकनवरे, शरद एकाड़, अजीज सय्यद, भारत ननवरे, अतुल भोसले पुणे, देवीदास नेमाने, आबासाहेब नेमाने, पांडुरंग ननवरे, हमीद इनामदार,मनोहर् नेमाने, जब्बार शेख, निखिल सरडे, बालाजी तरंगे, मारुती खटके, अनिकेत जाधव, जोतिराम तरंगे, बालम शेलार, दिलीप देशमुख, नितीन तळेकर, देविदास तळेकर, हनुमंत तळेकर, गणेश टकले, शकील शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न