स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ढिगपिपरी ची तपासणी
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ९ जानेवारी
भारत सरकार.पेयजल व स्वच्छता विभाग.जलशक्ती मंत्रालय,दिल्ली मार्फत IPSOS Research Private Ltd. संस्थेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021अंतर्गत दि.9 जानेवारी रोजी पथकप्रमुख प्रतिक्षा सस्ते यांनी ढगपिंपरी ता.परंडा या गावची स्वच्छतेसंदर्भात थेट निरीक्षण तपासणी केली
पथक प्रमुख प्रतिक्षा सस्ते यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणे,प्राथमिक शाळा,अंगणवाडी,ग्रा.पं.इमारत,धार्मिक स्थळे,वैयक्तिक शौचालये,शोषखड्डे,गांडूळखत निर्मिती प्रकल्प,बायोगॅस प्रकल्प याठिकाणी स्वच्छतेसंदर्भात पडताळणी केली.
SBM-MIS अंतर्गत विविध घटकांची प्रगती, नागरिकांचे प्रतिसाद,सार्वजनिक आणि संस्थात्मक ठिकाणी स्वच्छता,15 वा वित्त आयोगामार्फत करण्यात आलेली स्वच्छतेची कामे,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामे यांनी बाबींची तपासणी करण्यात आली
यावेळी विस्तार अधिकारी ए.सी.कावळे,विस्तार अधिकारी सूरज बोडके, सरपंच सौ.गुंफाताई लहु मासाळ, उपसरपंच सौ.प्रियंकाताई अशोक गरड, ग्रामसेवक श्री श्रीराम खरात,ग्रामसेवक डी.एन.गायकवाड,एच.एम.चौधरी,एम.एम.काशीद, ग्रा.पं.सदस्य सौ.सिंधुताई सुरेश येवारे,रामराजे काकडे, अशोक गरड,लहु मासाळ,सुरेश येवारे,बळीराम हिवरे,नितीन गरड,मुख्याध्यापक यशवंतराव पाटील, सहशिक्षक दत्तात्रय सोनवणे,रविंद्र पाटील,बाळासाहेब भंडारे, अनिता चिपडे,संगिता ठोंगे, नम्रता हांडे, अंगणवाडी कर्मचारी अल्का वासकर,जिजाबाई शिंदे,मनिषा येवारे,रेखा हावळे,आशा कार्यकर्त्या राणी गरड, रामचंद्र वाटाडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment