क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जि. प. शाळा कुरुलमध्ये विविध कार्यक्रमांने साजरी.
स्त्रियांच्या शिक्षणाची खरी,सावित्री तूच कैवारी,तुझ्यामुळेच शिकते आहे . आज प्रत्येक नारी ,
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
१८व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज १९१वी जयंती कुरुल जि.प.शाळा विविध स्पर्धा घेऊन साजरी करण्यात आली .
महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य १८व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
[]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कुरुल जिल्हा परिषद शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थीनीं व शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इयत्ता चौथी मधील श्रुती दिलीप ननवरे या विद्यार्थिनींनी अध्यक्षस्थान भूषवले त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थिनीचे भाषणे .त्यानंतर गीतगायन, ओवी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमांमध्ये सहभाग इयत्ता पहिली ते चौथी मधील मुलींनी घेतला होता. कुरुल जि. प. शाळेच्या शिक्षिका सौ.अनुराधा सोनवणे , सौ.स्मिता लामतुरे , सौ.सुवर्णा तोरखडे यांनी परिश्रम घेतले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुचंडे सर, केंद्रप्रमुख लांडे सर शिंदे सर ,कांबळे सर ,
गोवर्धनकर सर, शिक्षक सचिन शिंदे , मधुकर कांबळे , रामचंद्र लांडे,समाधान गोवर्धनकर, अनुराधा सोनवणे , स्मिता लामतुरे , सुवर्णा तोरखडे यांची उपस्थिती होती
Comments
Post a Comment