कुरुल येथे कै.आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या 9 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
कुरुल प्रतिनिधी: 5 फेब्रुवारी आण्णासाहेब पाटील साहेब यांचे 9 वे पुण्यस्मरण त्या निमित्त छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष समाधान जाधव व युवा नेते सिताराम जाधव व संघटनेच्या वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
मृत्युच्या दारात उभा राहुनी लढला
ज्याच्या जाण्याने देवही रडला
असा छावा महाराष्ट्राच्या मातीत घडला
तो छावा म्हणजे मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील
वय वर्ष 34 केसेस 36 अटक वॉरंट 36 श्वासात श्वास असेपर्यंत मराठा मराठा आणी फक्त मराठा
म्हणुन 350 वर्षानंतर मराठा म्हणुन जगणारा मराठा म्हणुन लढणारा आणी मराठा म्हणून मरणारा योध्दा म्हणुन अण्णासाहेब जावळे पाटील यांना ओळखले जात होते.
त्यावेळी छावा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष समाधान जाधव व सिताराम जाधव व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment