टिपेश्वर अभयारण्य सुरु करण्यासाठी सत्याग्रह आंदोलन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) केळापुर तालुक्यात स्थित असलेले टीपेश्वर अभयारण्य सह राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्प येथील शेकडो जिप्सी चालक कर्मचारी तसेच गाईड यांची होत असलेली उपासमारी टाळण्यासाठी अभयारण्याचे पर्यटन सुरु करावे अशी आग्रही मागणी. किशोर तिवारी (शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष) यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.मात्र या मगणीकडे दुर्लक्ष होत असल्याने दिनांक: ३१/१/२०२२ रोजी दुपारी १ वाजता टिपेश्वर अभयारण्याच्या प्रवेशद्वारासमोर सत्याग्रह आंदोलन किशोर तिवारी सह इतर कर्मचाऱ्यांनी जिप्सी चालक,गाईड यांनी ठिय्या मांडून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांनी घोषणा बाजी केली.काही अघटीत घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर वन सचिवांनी काही अटींचा आधारावर दोन दिवसात अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन दिले.या व्यतिरिक्त पर्यटन सुरु करन्यात येणार असल्याचे लेखी पत्र सुद्धा पांढरकवडा डीएफओ यांनी दिल्यामुळे टीपेश्वर अभयारण्यात सुरु असलेले सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा किशोर तिवारी यांनी दिली
Comments
Post a Comment