टाकळी येथे श्री विश्वकर्मा जयंती साजरी
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
कुरुल / प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
'ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे' या गीता प्रमाणे लोहार समाज नेहमीच व्यवसायाशी व समाजाशी प्रामाणिक राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धीच्या आणि शक्तीच्या जोरावर हे रयतेचे स्वराज्य उभे केले. मात्र यासाठी धारदार तलवारी व भाले लोहार समाजाने करून दिले आणि स्वराज्यासाठी मोठे योगदान दिले. अठरा पगड जातींचे स्वराज्य उभे राहिले असे प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी केले.
टाकळी (ता.माढा) येथे श्री प्रभु विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी सरकारमंत्री हर्षवर्धन पाटील, शिवसेना नेते संजय कोकाटे, जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सरपंच अजित तळेकर, माजी सभापती शिवाजी कांबळे, दीपक जाधव, रयत संघटनेचे सुहास पाटील, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, लोहार समाजाच्या मागण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी पक्षभेद विसरून आम्ही सदैव संघर्षासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी धुळा टकले, दादा कळसाईत, भाऊसाहेब काळे, अजित घाडगे, भाऊसाहेब लेंगरे, अर्जुन चव्हाण, ज्योतीराम घाडगे, सुरज चव्हाण, दत्तात्रय घाडगे, दादासाहेब गोपने, जगन्नाथ कळसाईत यांच्यासह समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment