गव्हारा येथे शेतकऱ्याची आत्महत्या
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ)झरी तालुक्यातील गवारा येथील शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १५ फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता उघडीस आली.
रमेश दत्तू राऊत वय अंदाजे ५८ वर्ष, गळफास लावून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. रमेश याच्या कडे ५ एकर शेती असून गेल्या अनेक वर्षांपासून शेतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होता. दर वर्षी शेतीत होणारे नुकसान त्यात शेती करीता लागणार खर्च मोठ्या प्रमाणात होता. तसेच शेतीकरिता बँकेचे कर्ज असल्यामुळे रमेश नेहमी विवंचनेत राहत होता. त्यातूनच रमेश याने त्याच्या शेता जवळ असलेल्या झाडाला दोर लावून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
गळफास घेतल्याची माहिती पसरताच गावकऱ्यांची गर्दी उसळली. घटनास्थळी पाटण पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहचले पंचनामा करून शव झरी येथे शविच्छेदन करीता पाठविण्यात आले. मृतकाच्या मागे पत्नी मुलगा असा परिवार आहे.
Comments
Post a Comment