शिवजयंती चे औचित्य साधून स्व जाहेदाबी शेख यांच्या स्मानार्थ वडणेर येथे नेत्र तपासणी शिबीर
पुणे येथील प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते तपासणी व उपचार
परंडा ( दि १७ )
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व जाहेदाबी शेख यांच्या स्मरनार्थ वडणेर ,सरणवाडी ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच जैनुद्दीन शेख यांच्या वतीने दि १९ फेब्रुवारी रोजी वडनेर येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन करन्यात आले आहे .
या शिबीरामध्ये पुणे हडपसर
महंमदवाडी येथिल एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉ प्रविण रणवरे , डॉ तुकाराम पार्टील , डॉ सुवर्णा गावडे ,हे उपस्थित राहुन तपासणी करून मोतीबिंदू , भिंगरोपण शस्त्रक्रिया करणार आहे .
शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांना नेत्ररोगावर उपचार करन्यासाठी शहरात जावे लागत आहे वयोवृध्द नागरीकांची गैर सोयदुर करन्या साठी सरपंच यांनी त्यांची स्व पत्नी,जाहेदाबी शेख यांच्या स्मरनार्थ वडणेर येथे दि १९ फेब्रुवारी रोजी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे .
या नेत्र शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच जैनुदीन शेख व अपना वतन संघटनेचे हामीद शेख यांनी केले आहे .
Comments
Post a Comment