जळीतग्रस्त कुटुंबाला 'जनशक्ती'चा मदतीचा हात जीवनावश्यक साहित्य घेऊन 'कमलाक्का' ने उभा केला संसार

▪️जळीतग्रस्त कुटुंबाला 'जनशक्ती'चा मदतीचा हात
▪️ जीवनावश्यक साहित्य घेऊन 'कमलाक्का' ने उभा केला संसार

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
 दिलमेश्वर (ता.करमाळा) येथील दादासाहेब बाबू राक्षे यांच्या राहत्या घराला काल अचानक आग लागली होती. या लागलेल्या आगीत त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने या राक्षे कुटुंबाचा संसार उघड्यावर आला होता, ही माहिती मिळताच जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खुपसे यांच्या मातोश्री कमलाक्का खूपसे-पाटील या मदतीसाठी पोचल्या आणि त्यांनी संसार उपयोगी साहित्य देऊन या गरीब कुटुंबाचा संसार उभा केला.

याबाबत माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील दिलमेश्वर येथील गरीब शेतकरी असणारे दादासाहेब राक्षे जुने घर सोडून नव्या झोपडीवजा घरात स्थलांतर झाले होते. मात्र अज्ञात कारणांमुळे त्यांच्या राहत्या घराला आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले होते. त्यामुळे राक्षे कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला होता. या कुटुंबाकडे कोणताही स्थानिक अथवा तालुका पातळीवरचा पुढारी फिरकला नाही. मात्र जेव्हा ही बाब जनशक्ती चे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांच्या मातोश्री कमलाक्का यांना समजली तेव्हा त्यांनी मुलाला याची जराही कल्पना न देता कार्यकर्ता राणा महाराज वाघमारे, रामराजे डोलारे यांना घेऊन थेट बाजारपेठ गाठली. या ठिकाणी काही दिवस पुरेल इतका किराणा बाजार, अंथरूण-पांघरूण, साड्या कपडे, भांडी असा सर्व संसार उपयोगी साहित्याचा लवाजमा घेऊन कमलाक्का दूर्घटनास्थळी पोहोचल्या  आणि त्यांनी त्या कुटुंबाला आधार देत सर्व साहित्य सुपूर्द केले. शिवाय तिथून त्यांनी गट विकास अधिकारी मनोज राऊत व तहसिलदार समीर माने यांच्याशी संपर्क साधून सदर कुटुंबाची दुर्दशा कळविली आणि मदत देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी पंधरा दिवसाच्या आत घरकुल देण्याचे आश्वासन देऊन भूमिपूजन करणार असल्याचे देखील सांगितले.
यावेळी दत्तात्रय मस्के, राजेंद्र मल्लाव, अशोक नगरे, सचिन मल्लाव, पप्पु कोळी, बालाजी तरंगे, जोतिराम तरंगे, बापु घाडगे, अतूल पाटील, शिवाजी शिंदे, बापू मस्के व ग्रामस्थ.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न