बेकायदेशीर मुरूम उपसा करणार्‍यावर कारवाई करावी अन्यथा प्रहार संघटना करणार खड्ड्यात गाडून घेऊन आंदोलन


तहसीलदार प्रशांत बेडसे साहेब यांना निवेदन देण्यात आले.वैभव जावळे 

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

प्रतिनिधी नानासाहेब ननवरे 

मोहोळ तालुक्यातील असलेली चिंचोली एम.आय.डी.सी येथे शासनाचा महसूल बुडवत तलाठी व सर्कल यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे मुरूम उपसा केला जात आहे याकडे महसूल प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे तरी 28 फेब्रुवारी पर्यंत सर्कल आणि तलाठी यांच्यावरती योग्य ती कारवाई   करण्यात यावी अन्यथा 1 मार्च रोजी मुरूम उपसा केलेल्या खड्ड्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील व शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्यातील सर्व पदाधिकारी सोबत घेऊन  गाढून घेऊन आंदोलन करणार आहोत याच्या दुष्परिणामास  सर्वस्वी मा.तहसीलदार यांना जबाबदार धरण्यात येईल अशीयाचे निवेदन तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांना देण्यात आले आहे .
यावेळी मोहोळ तालुका प्रमुख वैभव जावळे युवक तालुकाध्यक्ष नानासाहेब खांडेकर उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष विशाल सपकाळ औद्योगिक तालुकाध्यक्ष नितीन भोरे आबासाहेब गुंड बाबुराव वाघमोडे ज्ञानेश्वर वाघमोडे संतोष माने संदीप माने  आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न