भीषण अपघातात वडीला सह दोन चिमुकल्या मुलांचा जागीच मृत्यू


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
यवतमाळ : विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने कारला जोरदार  धडक दिली. या भीषण अपघातात दोन चिमुकल्या मुलांसह वडिलांचा जागीच मृत्यू  झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी (ता. २५) दुपारच्या सुमारास पांढरकवडा मार्गावरील वाकी फाट्याजवळ घडली.
यात सुनील कर्णुजी धुर्वे (वय ३८, रा. वळवाट, ता. पांढरकवडा), हार्दिक सुनील धुर्वे (वय 8), सुमित सुनील धुर्वे (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात नम्रता सुनील धुर्वे या गंभीर जखमी झाल्या. धुर्वे परिवार यवतमाळ येथून पांढरकवडाकडे जात असताना वाकी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक  दिली.
धडक इतकी भीषण होती की, दोन चिमुकल्यांसह वडिलांचा जागीच मृत्यू  झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नम्रता धुर्वे यांना उपचारासाठी यवतमाळातील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याघटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न