चिंचोली एमआयडीसी येथील कंपनीच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक भूमिका घेणार



पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे

सोलापूर जिल्हयातील चिंचोली एमआयडीसी येथील केमिकल कंपन्या आणि इतर कंपन्या यांची होणाऱ्या दुष्परिणामामुळे शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेला आहे या कंपनीच्या प्रदूषणामुळे लोकांना कॅन्सरचा भयानक आजार होत आहे त्याच प्रमाणे चिंचोली एमआयडीसी अक्कलकोट रोड वरील कंपन्या कामगारांना व्यवस्थितरीत्या सोयीसुविधा उपलब्ध  नाही आणि कंपनी मधील केमिकल युक्त पाणी कुठल्याही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अचानकपणे रात्री अप रात्री टॅंकरद्वारे तळ्यामध्ये सोडले जाते ही तळ्यांमधील पाणी सीना नदीला येते आजूबाजूच्या अनेक विहिरी व बोअर केमिकल दूषित पाणी येत आहे त्यामुळे अनेक शेतकरी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत जवळपास चिंचोली एम.डि.सी आणि अक्कलकोट रोडवरील यमाडिसी 350 ते 400 वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या असून गुजरात रबर, बालाजी अमाईन्स ,चेमिनोवा इंडिया केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, या सर्व कंपन्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग  प्रहार संघटनेकडे आहेत शेतात सोडलेले पाणी सर्व गोष्टी पुरावे प्रहार जनशक्ती पक्ष संघटनेकडे उपलब्ध आहेत त्यामुळे आठ दिवसाच्या आत हे सर्व बंद करावे अन्यथा आपल्या ऑफिस मध्ये तेच केमिकल कंपनी चे पाणी आणून टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी असे याचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्ष शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी कार्याध्यक्ष खालिद भाई मन्यार मोहोळ तालुका प्रमुख वैभव जावळे मोहोळ तालुका अध्यक्ष नानासाहेब खांडेकर उत्तर सोलापूर तालुका प्रमुख विशाल सपकाळ औद्योगिक तालुकाध्यक्ष नितीन भोरे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मोसिन तांबोळी दक्षिण तालुका संपर्कप्रमुख अभिमान घंटे व अनेक प्रहार सैनिक उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न