जनशक्ती चे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांचे सभापती विक्रम शिंदे यांना खुले आव्हान...
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
कुरुल प्रतिनिधी: नानासाहेब ननवरे
कुर्डुवाडी पंचायत समितीमध्ये जनतेने तुम्हाला निवडून देऊन पदावर बसवले आहे. त्या जनतेच्या कामासाठी आणि लोकांच्या हितासाठी बाजारच्या दिवशी तुम्ही येणे हितावह असते, जेणेकरून लोकांच्या अडीअडचणी सुटल्या जातील. एक तर तुम्ही पंचायत समिती मध्ये येत नाहीत आणि जनशक्ती ने न आलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला तर तुम्ही म्हणताय की 'आम्ही असताना अतुल खूपसे यांनी पंचायत समिती मध्ये यावे.' अतुल खूपसे यांनी तुमच्या घरात घुसून सभा घेतली. तुमच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांची कर्ज भरायला लावली. आणि तुम्ही फक्त पंचायत समिती मध्ये येण्याचे आव्हान करत आहेत हे हास्यास्पद असून एखादं मर्दासारखे आव्हान करा असं खुलं आव्हान 'जनशक्ती'चे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांनी विक्रम शिंदे यांना दिले.
पत्रकारांना बोलताना जगताप पुढे म्हणाले की, कुर्डुवाडी पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चालतो. कधीही येणे आणि कधीही जाणे, पंचायत समिती म्हणजे धर्मशाळा झाली आहे. त्यामुळे परिसरातील हजारो लोकांची कामे खोळंबली आहेत. सभापती व उपसभापती नात्याने पंचायत समिती मध्ये येऊन तुम्ही अधिकाऱ्यांवर वचक ठेवायला पाहिजे, लोकांची कामे व्हायला पाहिजे. जे कर्मचारी व अधिकारी लेट येतात त्यांना किमान विनंती किंवा सूचना करायला पाहिजे. एक तर हे काम तुम्ही करत नाही, बाजारच्या दिवशी तुम्हीच पंचायत समितीमध्ये गैरहजर असता, आणि वरून तुम्हीच 'जनशक्ती'ला चॅलेंज करता. ये कहा का न्याय है भाई..? म्हणजे हा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार म्हणावा लागेल.
जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे-पाटील यांनी तुमचे वडील आमदार, चुलते जि.प. अध्यक्ष व लोकसभेचे उमेदवार, भाऊ जि.प. सदस्य व तुम्ही स्वतः सभापती असताना अतुल खूपसे नावाच्या एका छोट्याशा कार्यकर्त्याने तुमच्या घरासमोर जाहीर सभा लावून तुमचे धिंडवडे काढले, शेतकऱ्यांच्या नावावर काढलेले कर्ज तुमच्या छाताडावर बसून भरून घेतले. इतके सारे असताना तुम्ही फक्त पंचायत समितीमध्ये येण्याचं आव्हान करत आहे हे हास्यास्पद आहे. तुम्हाला भिडायला जनशक्तीचा एखादा कार्यकर्ता पुरेसा आहे. तुम्ही फक्त वेळ, वार व दिनांक जाहीर करा असे आव्हान जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांनी शेवटी केले.
यावेळी महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी टोणपे राणा वाघमारे, गणेश गुंडगीरे
, सूरज धोत्रे महोन गायकवाड उपस्थित होते.
Comments
Post a Comment