पाटणबोरी येथे मराठी पत्रकार संघाची नवीन समिती गठित
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) केळापुर तालुक्यातील पाटणबोरी इथे दिनांक:८/२/२०२२ रोजी पत्रकार संघटनेची नवीन समिती गठीत करण्यात आली. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार श्री जयवंतराव भागानगरकर,अनिल गुंडेवार,मोबिन जाटू यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली , यावेळी पाटणबोरी पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी विनोद कनाके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सचिव पदी सचिन गुडेटवार, उपाध्यक्ष पदी आदित्य भागानगरकर , ,कार्याध्यक्ष कार्तिक धुर्वे ,प्रसिध्दी प्रमुख अमन सिडाम, सल्लागार गोपालजी शर्मा यांची निवड झाली व सदस्य सौ.संध्याताई भागानगरकर,सचिन पत्रकार , साजन किनाके , अजहरोद्दीन मलसन, उपस्थित होते
सर्व पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या उपस्थिती मध्ये बैठकीचे आयोजन करून ही निवड पार पाडण्यात आली.अतिशय आनंदी आणि खेळी मेंळी च्या वातावरणात सर्वानुमाते निवड झाली
Comments
Post a Comment