श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) पांढरकवडा शहरात दिनांक: ८/२/२०२२ रोजी श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली .श्रद्धांजली कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए .जलतारे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात लता दीदी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला .तसेच सदर कार्यक्रम लता दीदींना श्रद्धांजली देण्याकरिता गितगायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला संगीत विभागाचे विभाग प्रमुख प्रा.सरोदे सर उपस्थित होते त्यांनी आपल्या सुरेख आवाजात गीत गाऊन स्व.लता दीदी यांना श्रद्धांजली अर्पण केली सदर गीत गायन कार्यक्रमात डॉ. आर. ए.जलतारे सर. प्रा. टेकाम सर .तसेच इतरांनी सुद्धा गीत गायन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.एस एस.सत्तूरवार सर यांनी केले . सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीकांत मेश्राम,सतिश आरेवार, श्रीराम क्षीरसागर,संदीप आरेवार,यांनी विशेष परिश्रम घेतला.
Comments
Post a Comment