पांढरकवडा पोलिस यांची अवैद्य दारू वाहतुकीवर विशेष कार्यवाही. स्विप्ट वाहनासह २४ पेट्या देशी दारू जप्त

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी:-अमन वाघु सिडाम

(यवतमाळ) पांढरकवडा पो.उप.नी.संदीप बारिंगे पोलिस स्टॉफसह रात्री नाकाबंदी करीत असता   दिनांक:२/३/२०२२ रोजी  
सकाळी ४:३० च्या सुमारात  स्विप्ट वाहन क्रमांक  एम एच २९ ए डी ३२०६ ने यवतमाळ येथून करंजी येथे अवैद्यरीत्या  देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने सदर माहिती ठाणेदार जगदीश मंडलवार  सहेब  यांना देऊन  संपूर्ण स्टॉफसह खबरे प्रमाणे  सूरज लोहकरे यांचे शेतातील फार्म हाऊस जवळ सापळा रचला दारू पेट्या स्विप्ट वाहनातून उतरवित असता  पोलिस असल्याची त्यांना कुणकुण लागताच सूरज लोहकरे तेथून पळून गेला तर वाहनातील दोन इसम सुद्धा वाहन घेऊन पळून गेले दरम्यान त्यांचा पाठलाग केला असता स्विप्ट वाहन शेतातील फार्म हाऊस जवळ फसल्याने वाहनातील आरोपी वाहन सोडून पळून गेले त्यापैकी आरोपी वाहन चालक संतोष अर्जुन पुरी वय(२९)वर्ष यास पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले  संतोष हा विजय दुमोरे रा. डोर्ली यांचेसाठी काम करीत असून विजयचे सांगण्यावरून त्याचे स्विप्ट  वाहनाने करंजी येथील सूरज लोहकरे यास देशी दारू पोहचवित असल्याची कबुली दिली.आरोपी संतोष अर्जुन पुरी रा.गिरी नगर यवतमाळ यांचे ताब्यातील स्विप्ट वाहनातून १७ देशी दारू बॉक्स व लोहकरे यांचे शेतातून ७ देशी दारू बॉक्स असे एकूण ६९ हजार १२० रू. व स्विप्ट किंमत ३ लाख रू.असा एकूण ३ लाख ६९ हजार १२० रू.चा मुद्दे माल जप्त करून  चारही आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला    सदरची कार्यवाही ही  जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ व उपविभागीय पुलिस अधिकारी प्रदीप पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जगदिश मंडलवार,  पो.उप.नि.संदिप बारिंगे, पो.हवा.प्रमोद जुनुनकर, ना.पो.का. उमेश कुमरे, मारोती पाटील, पो.का.शशिकांत चांदेकर, राजु बेलेवार,छंदक मनवर यांनी ही कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न