युवा बिरसा पाटणबोरी तर्फे विर बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी करण्यात आली
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथे
दिनांक:-12/03/2022रोजी आदिवासी समाजाचे आद्यक्रांतिकारक ब्रिटिश राजवटीला व जमीनदार च्या विरोधात,आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात पेटून उठणारे वीर बापूराव पूलेश्वर शेडमाके यांची जयंती पाटणबोरी येथील स्थानिक आदिवासी समाज मंदिर येथे,येथील आदिवासी युवकांनी मोट्या उत्सवाने साजरी केली. या कार्यक्रमाला निमित्य संबोधित करताना बजरंग सिडाम यांनी एका वीर बापूराव शेडमाके यांनी एकट्याने ब्रिटिश राजवटी व जमीनदार विरोधी संघटन करून त्यांच्या विरुद्ध लढा उभा केले.व आदिवासी समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यात यशस्वी झाले.आज अश्याच वीर बापूराव शेडमाके सारखे आदिवासी मंध्ये युवक तयार होणे गरजेचं आहे. आज हि आदिवासी वरील अन्याय अत्याचार कमी झालेले नाही आहेत.किती आदिवासी युवक शिक्षण घेऊन बेरोजगार बसले आहे. नोकर भरती नाही.म्हणून आपले हक्क अधिकार साठी वीर बापूराव शेडमाके यांना सामोर युवकांनी आदर्श ठेवून सर्वांनी संघटित राहून आपल्या अधिकार साठी लढावे.असे जयंती निमित्त शब्दानी थोडा प्रकाश वीर बापूराव शेडमाके यांच्या जीवनावर टाकून काही आठवणी ताज्या करण्यात आल्या. ते आदिवासी युवकांनसाठी प्रोत्साहन येईल.या वेळी आदिवासी युवक अक्षय सिडाम, मारोती सिडाम, बजरंग सिडाम, अतुल कणाके, रवी कुमरे, विनोद कणाके, नितीन सिडाम, ओमकार कुळसंगे.. हे सर्व समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment