भैय्यासाहेब देशमुख व त्यांच्या सहकार्याना जामीन मंजूर होऊन सुटका झाल्यानंतर मिरवणुक
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
कुरुल प्रतिनिधी (नानासाहेब ननवरे)
: महावितरणच्या वीज तोडणी मोहिमेविरुध्द महावितरण कार्यालय मोहोळ येथे आ़ंदोलन करुन अधिकार्यास शिवीगाळ व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख, सुहास चव्हाण, यांच्या सह चौघा जणांना ची नागेश कोकरे यांचा जमीन स सूत्र ना यादी यु एल जोशी यांनी मंजूर केला यात हकिकत अशी की महावितरण तर्फे शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल वसुली चालू असून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे त्याविरुद्ध जुने शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन केले होते त्यावर प्रशासनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेल्या आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु प्रशासन आश्वासन पाळले नाही कारवाई चालूच ठेवली म्हणून महावितरण कार्यालय मोहोळ येथे जनहित शेतकरी संघटना व शेतकरी आंदोलन करत होते. आंदोलनाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी पवार साहेबांच्या ऑफिसला कुलूप लावून त्यांना करण्यात आलं होतं. *मोहोळ अभियंता पवार साहेबांनी निवेदन स्वीकारले असतं तर ऑफिसला कुलूप लावण्याची वेळ आली नसती शेतकरी सुहास चव्हाण यांचे उदगार*.
महावितरण अधिकारी पवार साहेब यांनी धमकी व शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद मोहोळ पोलिस स्टेशन येथे केली होती.
त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता यात आरोपी तर्फे ॲड जयदीप माने संतोष कुमार बाराचारे यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची जामीन मंजूर करण्यात आला. सुटका करण्यात आली त्यावेळेस मोहोळ पोलीस स्टेशन पासून शिवाजी चौका पर्यंत प्रभाकर भैया देशमुख यांना खांद्यावर घेऊन शेतकरी बांधवांनी मिरवणूक काढण्यात आली.मोहोळ शिवाजी चौकात शेतकरी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आले. त्यावेळी भैय्यासाहेब म्हणाले शेतकऱ्याविषयी १०० गुन्हे झाले .तरी लढत राहणार.. त्यावेळी एकच घोषणा भैय्यासाहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.शेतकरी बांधवांनी जयघोष केला.जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निकम,अनिल वसेकर,बबलु गुरव, चंदु चव्हाण, निलेश चव्हाण, धनाजी माळी, पांडुरंग माळी, दिनेश चव्हाण,विराज चव्हाण,व जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment