पाटणबोरी नायब तहसील कार्यालया समोर आंदोलन निदर्शने


नायब तहसीलदार राजू मोटमवार साहेब यांना निवेदन दिले
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) पांढरकवडा पाटणबोरी अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य कौन्सिल बैठकीमध्ये महाराष्ट्रभर  ठरल्याप्रमाणे यवतमाळ जिल्हा किसान सभेच्या वतीने पाटणबोरी येथे नायब तहसीलदार कार्यालय वर निदर्शने आंदोलन करण्यात आलेआहे.
राज्य कौन्सिलच्या बैठकीमध्ये देश व राज्य स्तरावरील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न व त्यावर होत ,असलेल्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. देशस्तरावर संपन्न झालेल्या शेतकरी आंदोलनामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची मुख्य मागणी मंजूर करण्यात आली आहे. मात्र अद्यापही आधार भावाच्या संरक्षणाबद्दलचा लढा अपूर्ण आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे नेण्याचे देशस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या पातळीवर शेतकऱ्यांचे काही ज्वलंत प्रश्न समोर आले आहेत. 
            शेतकऱ्यांचे थकित वीज बिल वसूल करण्यासाठी राज्य सरकारच्या संमतीने वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम राज्यभर हाती घेतली आहे. शेतकऱ्यांची उभी पिके त्यामुळे करपू लागली आहेत. शेतकरी समुदायात या मोहिमेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही शेतकरी संघटनांनी याबद्दल आंदोलन सुरू केले आहे. किसान सभेने या प्रश्नावर मजबूत हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय अतिरिक्त उसाचे गाळप, पीक विमा, घरकुल, निराधार पेंशन, जमीन नावे करा, वन जमिनीचा पट्टे द्या, या सारख्या प्रश्नांवर आंदोलन तीव्र करण्याची हाक कौन्सिलने दिली आहे. त्याला पाठिंबा देत 16 मार्च 2022 रोजी शेतकऱ्यांच्या व जनतेच्या मागण्या घेऊन  दिनांक 16 मार्च 2022 रोजी  पाटणबोरी नायब तहसील कार्यालय  येथे आंदोलन निदर्शने करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार राजू मोटमवार साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी किसान सभा जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड चंद्रशेखर गो. सिडाम,कॉ भाऊराव टेकाम, प्रकाश संकरवार,कॉ.सुरेखा बिरकुलवार,कॉ.उरकुडा गेडाम ,कॉ. कॉ .मारोती कुमरे, कॉ.गंगाराम पवार, कॉ. दिलीप कुमरे, कॉ. मारोती आत्राम, कॉ. अय्या आत्राम, कॉ. सोनू आत्राम, कॉ. रामजी टेकाम,कॉ. सुमित्रा भोंग. कॉ. संदीप सुरपाम, कॉ. प्रशांत लसंते.व अनेक कॉम्रेड या आंदोलनात सहभागी झाले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न