ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) केळापुर
दिनांक 21 मार्चला पहाटे सहा वाजताच्या सुमारास रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरला अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश हनुमंत मिरलवार वय 27 रा.पाटणबोरी ट्रॅक्टर क्रमांक ने वारा कवठा येथील रेती भरून पाटणबोरी कडे येत असताना ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले .झालेल्या अपघातात चालक प्रकाश वय २७ वर्ष व त्याचा ट्रॅक्टर वरील सहकारी किरण सुरेश जाधव वय 34 वर्ष रा. पाटणबोरी हे दोघेजण जागेवरच ठार झाले. सकाळी साडेपाचच्या सुमारास वारा कवठा येथून रेती पाटणबोरी कडे भरून ट्रॅक्टर घेऊन येत होते .पाटणबोरी जवळील साईड रस्त्यावर प्रकाशचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर रोडवर धडकला. या जागेवर रेतीचा ढिगही दिसून आला. रेतीच्या ढिगार्यामुळे नियंत्रण सुटल्याचे बोलले जाते ,ट्रॅक्टरची दोन्ही चाके तुटून पडली. या अपघातात दोघांनाही जबर मार बसला. प्रकाश चे आतडे बाहेर पडले .दोघांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघही जागेवरच मृत्युमुखी पावले . आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, जमादार वसंत चव्हाण ,कॉन्स्टेबल राम राठोड, सचिन काकडे अधिक तपास करीत आहे .घटनेचे अपराध क्रमांक 364 /2022 कलम 279,304( अ)भा.दं .वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर घटनेची फिर्याद ज्ञानेश्वर हनमंतू मिरलवार यांनी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे दिली.
Comments
Post a Comment