विज बिल माफ करण्यासाठी व वीज बिलापोटी जमा केलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कुरूल येथे रास्ता रोको आंदोलन.
पुज्य नगरी ऑनलााई न्यूज
कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
कुरुल : शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या थकीत बिलास स्थगिती देण्याऐवजी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी संजीवनी योजना राबवून शेतकरी विज बिल मुक्त करा. व गेल्या सहा महिन्यापासून शेतीपंपाची वसूल केलेली वीज बिले ही परत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावीत या मागणीसाठी कुरूल (ता. मोहोळ) येथील कुरुल- सोहाळे चौकात पंचायत समिती सदस्य जालिंदर भाऊ लांडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे म्हणाले की, " आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतल्यास २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेला कुठल्याही पक्षाशी युती किंवा आघाडी करण्याची गरज भासणार नाही. स्वबळावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सत्तेत असेल, नाहीतर शिवसेनेत फक्त पदाधिकारीच उरतील असा इशारा यावेळी लांडे यांनी दिला. राज्यात गेल्या वर्षी शिवसेना - भाजप युतीचे सरकार होते. तत्कालीन फडणवीस सरकार मध्ये शिवसेनेच्या काही मंत्र्यांचा समावेश होता, तेव्हा सर्व शेतकऱ्यांची वीज बिले पूर्ण माफ करावेत ही तुमची इच्छा व मागणी होती. परंतु फडणवीस सरकारच्या काळात सत्तेत असतानाही शेती पंपाची वीज बिले माफ करू शकला नाहीत.
आपण मराठवाडा, कोकण, विदर्भ , पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यावर गेल्यावर शेतकऱ्यांची वीज बिले माफ झालीच पाहिजेत अशी सतत विधान करून शेतकऱ्यांना आधार देत होता. आत्ता आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. काही अपक्ष आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या मित्र पक्षाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालात. आता तुम्ही शेतकऱ्यांची शेती पंपाची वीज बिले माफ करण्याची आपली इच्छा पूर्ण करू शकता.
या आंदोलनात प्रशांत पाटील, बाबासाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य जालिंदर लांडे, कुरुल तंटामुक्त समितीचे अध्यक्ष छत्रपती जाधव, कुरुलचे उपसरपंच पांडुरंग जाधव, भाजपाचे बाबासाहेब जाधव, प्रशांत पाटील,ग्रामपंचायत सदस्य सिताराम लांडे, आनंद जाधव, माणिक पाटील, प्रकाश आंबरे,सुभाष माळी, विष्णू जाधव, अंबादास गुरव, राजेंद्र लांडे, प्रमोद लांडे, बाळासाहेब लांडे, श्रीरंग गुरव, शंकर पाटील, शंकर धोत्रे, विमल काटकर, धनाजी चंदनशिवे, बाळासाहेब लांडे, दत्तात्रय बाेंगे. प्रमोद लांडे, चंद्रकांत जाधव, तात्या माने, हरी अवताडे, किसनदेव पाटील, आदींची उपस्थिती होती.
मोहोळचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता सुरेश पवार यांना निवेदन देण्यात आले.
Comments
Post a Comment