गौडरे येथिल संभाजी विद्यालयात पर्यावरण सेवा योजना चे कार्य कौतुकास्पद
गौडरे येथिल संभाजी विद्यालयात पर्यावरण सेवा योजना चे कार्य कौतुकास्पद
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज़
करमाळा ( दि २५ )
करमाळा तालूक्यातील गोंडरे येथिल धर्मवीर संभाजी विद्यालयात पर्यावरण सेवा योजना सातत्यपूर्ण जोपासली जात आहे .फळांचे बिया जमा करून विद्यार्थी रोप तयार करून लागवड करन्यात येणार आहे शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे .
विद्यालय 10 जून 1997 ला सुरू झालेले असून या विद्यालयांमध्ये 2015 पासून पर्यावरण सेवा योजना मुख्याध्यापक बापू नीळ यांच्या सहकार्याने पर्यावरण योजना प्रमुख हरिदास काळे हे राबवत आहेत.
2015 पासून दर दोन वर्षासाठी 50 विद्यार्थ्यांची निवड करून विद्यार्थ्या मार्फत महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजना सातत्यपूर्ण राबवत आहेत या शाळेची निवड पुणे विभाग प्रमुख गणेश सातव यांनी केली होती. त्यांचे मार्गदर्शन आज मोलाचे ठरत असून शाळेचे कार्य कौतुकास्पद आहे कुठले उपक्रम राबवतात या उपक्रमाची माहिती सर्व विद्यार्थी सांगू शकतो .
या शाळेतील शिक्षक व विदयार्थीच्या कार्याचे कौतूक होत आहे .
Comments
Post a Comment