सहाव्या दिवशीही प्रहारचे उपोषणाला प्रांताधिकारी यांचे दुर्लक्ष


प्रतिनिधी नानासाहेब ननवरे

 मंगळवेढा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 या मार्गामध्ये भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी मंगळवेढा  तालुका  प्रहार संघटनेने मंगळवेढा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सलग सहाव्या दिवशी उपोषण सुरू ठेवले आहे तर या उपोषण स्थळी  आंदोलनाला प्रहार व शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागल्याची दिसून आले आहे काझी मॅटर मधील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून सुरू असलेले उपोषणाची चर्चा मंगळवेढ ,सांगोला तालुका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये हे पैसे नक्की अडवले कुणी हा मोठा सवाल शेतकरी वर्गात चालू झाला आहे आंदोलन नाकाची  प्रकृती कमी जास्त प्रमाणात बिघडत आहे त्यामुळे आजच्या दिवशी उपोषणस्थळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली तर प्रांताधिकारी ‍यांनी पाठ फिरवली हे दिसून आले आहे त्यामुळे प्रहार संघटना अजून आक्रमक झाली आहे जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी अशी भूमिका ठामच आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील ,उपोषणकर्ते सिद्रा या माळी ,  कृषिराज परिवाराचे युवराज शिंदे,प्रहारचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, अपंग क्रांती चे तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, मंगळवेढा शहराध्यक्ष आनंद गुंगे,रामा मेटकरी ,अंकुश सकट ,तानाजी पवार, अरुण अवताडे ,जगु गायकवाड ,अनिल धोडमिसे, सुधीर हजारे ,शकील खाटीक, नागेश मुद्गुल, सविता सुरवसे ,मारुती डोके, विशाल लेंडवे,बाळु आवताडे हे उपस्थित आहेत

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न