विजकपातीची योग्य कारणे शोधून शहानिशा करा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) पांढरकवडा
पाटणबोरी गावातील सार्वजनिक पथदिव्यांचा वीजपुरवठा दोन दिवसांपूर्वी थकीत विजबिलामुळे खंडित करण्यात आला होता.खंडित वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर विविध समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विजकपातीची योग्य कारणे समजून त्याची शहानिशा करावी असे स्पष्टीकरण खंडित वीजपुरवठ्याच्या विषयांवर आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामपंचायत सदस्य कपिल दरवरे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस सरपंच निता उप्परवार,उपसरपंच नीलिमा कायतवार, व काही ग्रामपंचायत सदस्यगण प्रामुख्याने उपस्थित होते.चालू पंचवार्षिक शासन काळात थकीत विजबिलापेक्षा मागील पंचवार्षिक शासन काळातील खूप मोठ्या प्रमाणात वीजबिल थकीत ठेवण्यात आले होते.हे कपिल दरवरे यांनी आकडेवारी सह स्पष्ट केले.खंडित करण्यात आलेल्या वीजपुरवठ्याबद्दल जी.प. सदस्य गजानन बेजंकीवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या प्रयत्न नंतर वीजपुरवठा पुर्वरत करण्यात आले असे देखील त्यांनी स्पष्ट केले केवळ पाटण बोरी ग्रामपंचायतच नव्हे तर परिसरातील सरव्हच ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची विजकपात करण्यात आली होती हे देखील त्यांनी आवरजून सांगितले शासनाच्या वेगवेगळ्या शासन निर्णयाचा पुरावा देत संदर्भासहित माहिती देत अफवांवर विश्वास न ठेवता ग्रामस्थांनी घटनेची शहानिषा केली पाहिजे असे सांगत त्यांनी त्यांच्या शासन काळात भरण्यात आलेल्या रक्कमेची माहिती दिली
Comments
Post a Comment