भरधाव ट्रकच्या जबर धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार तर एक जन किरकोळ जखमी
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(वणी)
भरधाव ट्रक ने दुचाकीला जबर धडक दिल्याने यात वणी येथील शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला गुरुवार दि. 31 मार्चला सकाळी 7 वाजताचे सुमारास घडली.
प्रशांत बुरांडे (वय३५) रा. प्रगतीनगर वणी असे मृतक शिक्षकाचे नाव आहे.प्रशांत कुरई येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. प्रशांत बुरांडे (वय३५) व श्रीकांत उपाध्ये (वय 53 ) हे दोघेही शाळेत जाण्यासाठी निघाले. प्रशांत दुचाकीच्या मागे बसले होते. चारगाव गावाजवळील वळणावर अचानक बैल आडवा आला व त्यांनी ब्रेक मारला असता आणि मागून भरधाव येणारा ट्रक क्र. MH46 AF 5385 ने प्रशांतचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवत असलेले श्रीकांत उपाध्ये हा किरकोळ जखमी झाला आहे.शिक्षक प्रशांत यांच्या मागे आई, वडील, पत्नी व मुलगा असा मोठा परिवार आहे.या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःख कोसळले आहे.अश्या या झालेल्या अपघाताने शिक्षकांमध्ये व परीसरात दुखःचे वातावरण पसरलेले आहे.पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे
Comments
Post a Comment