तीन वर्षापासून पांढरकवडा- झरी रस्त्याचे बांधकाम रेंगाळले
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ)
पांढरकवडा ते झरीजामणि या रस्त्याचे काम मागील तीन वर्षापासून सुरू आहे परंतु अजूनही पूर्ण झालेले नाही दोन्ही बाजूंनी रस्ता खोदलेला असल्यामुळे तसेच रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावर रोज अपघात घडत आहेत.तीन वर्षापासून रेंगाळलेले या रस्त्याचे काम पूर्ण व्हायला पुन्हा किती वर्षे लागणार असा प्रश्न या भागातील नागरिक विचारत आहेत दुचाकी असो की चार चाकी गाडी असो कोणत्याही
गाडीने या रस्त्यावर आपण सहजपणे प्रवास करूच शकत नाही. जीव मुठीत घेऊनच या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचे अनेकदा टायर फूटत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अपघात होत आहे आज पर्यंत रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत अत्यंत महत्वच्या आणि वर्दळीच्या असलेल्या झरी ते पांढरकवडा या ३५ किलोमिटर रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे या भागातील जनतेला आनंद झाला होता.लवकरच आपल्याला गुळगुळीत रस्त्यावरून प्रवास करता येईल .अशि त्यांना अपेक्षा होती परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला या रस्त्याच्या कामासाठी केवळ दोन्ही बाजूंनी खड्डे खोदून ठेवले असून अर्धवट काम करण्यात आले आहे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामुळे अनेकांना अपंगत्व आलेले आहे चंद्रपूर लोक सभा मतदार संघातील आर्णी - केळापुर व वणी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या या महत्वाच्या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून रेंगाळले असून कंत्राटदाराचा पता नहीं कोणताही लोकप्रतिनिधी याबाबत आवाज उठवायला तयार नाही
Comments
Post a Comment