श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालया तर्फे दत्तक ग्राम सोनबर्डी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन समारोह संपन्न
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ)
स्थानिक श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा, दिनांक 20 मार्च 2022 रोजी दत्तक ग्राम सोनबर्डी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा उद्घाटन समारोह संपन्न झाला, सदर समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर .ए जलतारे सर तर शिबिराचे उद्घाटन म्हणून माननीय श्री सुरेश कव्हळे साहेब तहसीलदार पांढरकवडा हे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी तहसीलदार साहेबांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व पटवून दिले.सदर कार्यक्रमाला दत्तक ग्राम सोनबर्डी च्या सरपंच सौ मीनाताई गेडाम तंटा मुक्ती समिती अध्यक्ष विजयभाऊ ठमके पोलीस पाटील श्री प्रकाश मंदे श्री सुभाष कनाके तसेच गावातील इतर माननीय मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉक्टर रंजना महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कनाके सर यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन टेकाम सर यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे वरिष्ठ कनिष्ठ आणि एमसीवीसी विभागातील सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment