जय नागराज देवस्थान टेंभी येथे श्रीमद भागवत सप्ताह संपन्न
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ)पांढरकवडा :-* तालुक्यात अध्यात्मिक सुरू असलेला सात दिवशीय सप्ताह दि.२५ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत सुरू असलेला श्रीमद भागवत सप्ताह टेंम्बी,सुसरी,सुन्ना,ढोकी ह्या गावकऱ्यां मार्फत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. देवस्थानच्या वतीने सात दिवसात विविध कार्यक्रमांच्या नियमावलीप्रमाणे अनेक अध्यात्मिक,तसेच विविध समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अध्यात्मिक वातावरणामुळे जयनागराज देवस्थानात एक सकारात्मक अध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण झाले. श्रीमद भागवताचार्य ईश्वर मासटवार महाराज यांनी श्रीमद भागवत कथेचे प्राचारण केले. कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी काल्याचे कीर्तन पार पडले. असंख्य बाजीराव बाबा शिष्यगण कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमात गावकऱ्यांकडून विशेष सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment