जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा कुरुल वतीने वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन व महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान..

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे 
कुरुल, दि.८: 
जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी कुरुल जिल्हा परिषद शाळेच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रथम सावित्रीबाई फुले, जिजाऊ आईसाहेब, राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सरपंच सौ . चंद्रकला माणिक पाटील ग्रामपंचायत सदस्य अंजली गायकवाड ,मोहिनी सुहास घोडके, अनुराधा सोनवणे , स्मिता लामतुरे , सुवर्णा तोरखडे  अंगणवाडी सेविका व यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लहान  मुलींचे भाषण व महिलांची भाषणे झाली.त्यानंतर स्पर्धेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली स्पर्धेमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनीची उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. रांगोळी स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, घेण्यात आल्या.. .यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ चंद्रकला पाटील व ग्रा.पं. सदस्य मोहिनी घोडके, ग्रा.पं, अंजली गायकवाड व अंगणवाडी सेविका जयश्री अंकुशराव, अनुराधा गायकवाड यांची समयोचित भाषणे झाली.

यावेळी केंद्रप्रमुख रामचंद्र लांडे सर, मुख्याध्यापक मुंचडे सर, शिक्षक सचिन शिंदे सर  , मधुकर कांबळे सर  , समाधान गोवर्धनकर सर , शिक्षिका  अनुराधा सोनवणे मॅडम , स्मिता लामतुरे मॅडम, सुवर्णा तोरखडे मॅडम व  ग्रामपंचायत सरपंच सौ चंद्रकला पाटील, सदस्य रोहिणी तगवाले, मोहिनी घोडके, अंजली गायकवाड,शंनू मुलाणी, संगीता शिंदे,आरोग्य सेविका एस. के. माने,
एस. आर बनकर,वैशाली निंबाळकर,  ,अंगणवाडी सेविका संगीता रोडे,शोभा कुंभार,जयश्री अंकुशराव,बेबी गायकवाड, वर्षा भालेराव,मालन घोडके,अनुराधा गायकवाड,अंजली माने,कविता खरात, उमा गोरे, सुवर्णा शिंदे, मालन कुंभार, लक्ष्मी माने, उज्वला खिलारे,रेणुका जाधव,अनिता डमरे, जयश्री घोडके, मनीषा जाधव, महादेवी सुतार, कल्पना पवार आदींसह सर्व सेविका, मदतनीस आशा वर्कर उपस्थित होत्या , कार्यक्रमाचा समारोप शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आभार तोरखडे मॅडम यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न