बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात मराठी भाषा दिन व मराठी अभ्यास मंडळाचे उद्घाटन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
:बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला तसेच मराठी अभ्यास मंडळाचे उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यीक कथाकार डॉ अजितसिंग चहाल हे लाभले. या प्रसंगी डॉ. अजितसिंग चहाल यांनी मराठी भाषेची माहीती विविध उदाहरणे देत स्पष्ट केली. मराठी भाषा हे अमृतातेही पैजा जिंके अशी आहे मराठी भाषा वृद्धींगत करण्यासाठी सगळ्यांनी जाणिवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे प्रत्येकाच्या मनात आपल्या मातृभाषेबदल प्रेम असायलाच पाहिजे मराठी भाषेचा गोडवा अविट असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात विषद केले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या मराठी विभागामार्फत मराठी अभ्यास मंडळाचे उदघाटन देखील प्रमुख पाहुणे डॉ अजितसिंग चहाल यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ अजितसिंग चहाल यांनी विद्यार्थ्यांना मराठी अभ्यास मंडळाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर ए जलतारे हे लाभले त्यांनी देखील मराठी अभ्यासमंडळ व मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या विभागप्रमुख डॉ ए. ए. चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा एन. जे टेकाम यांनी केले.
तर मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आदर्श मोतेकार यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली या प्रसंगी अनेक विद्यार्थी उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक वृंद देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागामार्फत करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना सहकार्य लाभले
Comments
Post a Comment