रेड्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर पांढरकवडा पोलिसांची कारवाई


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ)
पांढरकवडा : केळापूर टोल नाक्यावरून रेड्यांची अवैध वाहतूक करनाऱ्या  कंटेनर पोलिसांनी दि ७ मार्च  रोजी  पकडून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
या प्रकरणी  तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे 

ट्रक क्रमांक एन.एल.०१ क्यु,०९२१ मध्ये जनावरे कोंबून राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून तेलंगणा राज्यात जात होती. याची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी सापळा रचून केळापूर टोलनाक्यावर कंटेनरची चौकशी केली. यावेळी कंटेनरमधून तब्बल ४९ म्हशीचे (रेडे) आढळून आले.
याप्रकरणी आरोपी ट्रकचालक तालिब निज्जर मेह रा.  हरियाणा) त्याचा साथीदार आसिफ एहसान कुरेशी व कासीम अब्दुल गफार दोघेही रा. पुराना कसबा (उत्तर प्रदेश) या तिघांना ताब्यात घेतले. कंटेनरसह ४९ म्हशी (रेडे) असा मिळून २३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील आरोपीविरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.

 ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, पोलीस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड, राजू मोहुर्ले, सिद्धार्थ कांबळे, प्रकाश भगत यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न