श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिना निमित्त ग्रंथ प्रदर्शन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
पांढरकवडा ( दि २४ ) स्थानिक बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिना निमित्त ग्रंथालय विभागातर्फे दिनांक: २३/४/२०२२ रोजी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. ए.जलतारे ऊपस्थित होते प्रमुख वक्ते म्हणून इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.ए.व्ही.रेडे सर उपस्थित होते प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयातील प्रा.डॉ.ए.ए.चौधरी ऊपस्थित होत्या .
कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक मा.वी.ग्रंथपाल एस.एस.सत्तूरवार यांनि केली.पुस्तक दिनाचं महत्व व त्याचा आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणाम या संदर्भात डॉ.ए.ए.चौधरी,व प्रा.ए. व्ही.रेडे सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या अध्यक्ष भाषणात प्रा.डॉ.आर.ए.जलतारे सर यांनी आजची लोप पावत असलेली वाचन व संस्कृती कशी टिकवून ठेवता येईल या वरील उपाय योजना सांगून महाविद्यालयातील ग्रंथ संपदा तसेच ग्रंथ प्रदर्षणी संदर्भात विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अध्यक्षीय भाषना नंतर उपस्थिकांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली कार्यक्रमाच्या यशस्विते करीता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच श्रीकांत मेश्राम,सतीश अरेवार,संदीप अरेवार,श्रीराम,यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment