राहत्या घरी तरुणीची गळ फास घेऊन आत्महत्या
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) पांढरकवडा शहरातील तरुणींनी आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पांढरकवडा शहरातील पटेल लेआउट येथील कुमारी शिवाणी गणेश खोंडे (वय-२४) या तरूणीने आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि. ५ मे २०२२ रोज गुरूवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली
या घटनेची माहिती परिसरात पसरता नागरिकांनी पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेवून मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होवून या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह अंत्यविधीसाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत आहे.
Comments
Post a Comment