वाशिम तालुक्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांची खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण व आढावा सभा दि १८ रोजी संपन्न झाली
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
वाशिम तालुक्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांची खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण व आढावा सभा दि १८ रोजी संपन्न झाली
या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर उपस्थित होते.यावेळी सुनील पाटील जिल्हा अध्यक्ष कृषि व्यवसाईक संगठना वाशिम,नितीन पाटणी माफदा संचालक,चंद्रकांत भागडे मोहीम अधिकारी जि प ,अनिल कंकाळ तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड,मंडळ कृषी अधिकारी श्री उमेश राठोड,भागवत किंगर,प्रकाश कोल्हे कृषी अधिकारी,जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सोंनटक्के,वैशाली गावंडे विस्तार अधिकारी ,विधाता प्रशिक्षण केंद्राचे नोडल अधिकारी श्री देशमुख व तालुक्यतील कृषी निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.
सदर सभेत शेतकऱ्यांना दर्जेदार व रास्त दरात खते बियाणे उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने आवशक ती कार्यवाही व नियोजन करण्याचे सूचना विभागाच्या वतीने विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे ज्यादा दराने खते व बियाणे विक्री करण्यात येऊ नये अशी ताकीद देण्यात आली.
सर्व अभिलेख अद्यावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आले.
बियाणे विक्रीपूर्वी उगवण क्षमता चाचणी घेण्यात येऊनच विक्री करण्यात यावे अश्या सूचना कृषी आयुक्तलायकडून प्राप्त झाल्याची माहिती सभेत देण्यात येऊन अंमलबजावणी करण्यात यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पीक पद्धतीनुसार विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पिकांना खते उपलब्ध करून देण्यात यावेत यासाठी नियोजन करण्यात आले व DAP खताऐवजी इतर सयूंक्त खताचा वापर करण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे व सोयाबीन च्या अष्टसूत्रीचा वापर जनजागृती साठी कृषी विक्रेत्यांनी पुढाकार घ्यावा याबाबत श्री बंडगर कृषी विकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.व आवाहन केले.
सूत्रसंचालन व आभार रमेश भद्रोड ,कृषी अधिकारी पंचयत समिती वाशिम यांनी केले.
Comments
Post a Comment