टी.डी.आर.एफ. वर्धापन दिनानिमित्त १ ते ९ मे या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन सप्ताहाचे आयोजन
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ)पांढरकवडा
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत असलेल्या TDRF ला दिनांक 9 मे रोजी 17 वर्षे पूर्ण होत आहे. दरवर्षी सर्व TDRF जवान एकत्रित येऊन वर्धापन दिन साजरा करतात. त्यानिमित्त TDRF द्वारा यावर्षी राज्यातील सर्व जिल्ह्यातील व तालुक्यातील TDRF अधिकारी व जवान 1 मे ते 9 मे या कालावधीत TDRF वर्धापन दिन साप्ताह साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त आयोजित सप्ताहात TDRF जवानांकडून TDRF संचालक संस्थापक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
पांढरकवडा तालुक्यामध्ये दि.६ मे 2022 रोजी TDRF जवानांकडून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली के. इ.एस हायस्कूल पासून सुरू करण्यात आली. त्यावेळी रॅलीमध्ये पर्यावरण संवर्धन, पक्षी व प्राणी यांच्यासाठी पाणपोई, बेटी बचाव बेटी पढाव,स्वच्छ भारत सुंदर भारत, प्रदूषण मुक्त भारत, पाणी अडवा पाणी जिरवा इत्यादी विषयांवर रॅलीच्या माध्यमातून जनजागृती केली सोबतच कृष्णा टेकडी येथे पक्ष्यांसाठी तयार केल्या पाणपोई लावून रॅलीचा समारोप केला. या रॅलीमध्ये अनेक TDRF जवानांना सक्रिय सहभाग होता.
सर्व उपक्रम TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या मार्गदर्शनात TDRF जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस, TDRF पांढरकवडा कंपनी कमांडर मोहम्मद जिलानी अन्सारी,घाटंजी कंपनी कमांडर सागर खटाळे, सहायक कंपनी कमांडर अभय संदलवार, लक्ष्मी जाधव, घाटंजी सहायक कंपनी कमांडर किशोर खटाळे सोबतच दर्शना चेके, नागेश जक्कावार, ज्योती सलाम, कैलाश चव्हाण, अंजली मेश्राम, धीरज देवधरे, ऋतिक भुरे, प्रीती जाधव, राणी चव्हाण, सुमित वड, प्रणाली काकडे, पल्लवी शिरपूर व इतर टीडीआरएफ अधिकारी व जवान सहभागी होते.
Comments
Post a Comment