महिलेची निर्घृण हत्या; नग्न अवस्थेत वांजरी येथील खैरगाव उजाड शिवारात आढळला मृतदेह*



प्रतिनिधी अमन वाघु सिडाम 

       (यवतमाळ) पांढरकवडा.वांजरी येथील खैरगाव उजाड शिवारात अत्यंत धक्कादायक घटना घडली. कारेगांव बंडल येथील एका महिलेचा खून करुन तिचे प्रेत वांजरी जंगलातील शेत शिवारात नग्नावस्थेत आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पांढरकवडा अंतर्गत येणाऱ्या कारेगांव बंडल येथील कावेरी जलपत तोडसाम वय (३५) ही महिला बचत गटाचे काम करते. ती दोन दिवसापूर्वी त्याच्या जावाई उमरी येथील ख्रिश्चन दवाखान्यात पाहण्यासाठी आली होती. त्यानंतर ती त्याच दिवशी गावाकडे जाण्यासाठी दुपारी ४ वाजता त्याच्या बहिणीच्या मुलाने तीला पांढरकवडा बसस्टॅन्डवर सोडून तो उमरी येथे निघून गेला होता.परंतु ती २ दिवस झाले तरी आपल्या गावाला पोहचले नसल्यामुळे तीच्या नातेवाईकांनी  दि. १० जून रोजी ती बेपत्ता असल्याची तक्रार पो.स्टे.ला नोंदविली होती. अशातच  दुपारी ४ वाजता वन अधिकाऱ्याकडून पोलीसांना माहिती मिळाली की, एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत व नग्नावस्थेत वांजरी खैरगाव उजाड शेत शिवारात प्रेत पडून आहे. त्यानंतर पोलीसांनी तेथे जावून पाहणी केली असता तसेच बेपत्ता महिला हीच असल्याची शाहनिशा नातेवाईकांकडून करुन घेतली असता ती कारेगाव बंडल येथील कावेरी तोडसाम असल्याचे समजले. तीच्यावर चाकूने ७ ते ८ घाव केल्याचे दिसत असून पोलीसांनी या प्रकरणी कलम ३०२,२०१ चा गुन्हा दाखल करुन प्रेत उत्तरीय तपासणी करुन प्रेत नातेवाईकांना देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न