गजानन चांदेकर यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा पोलीस अधीक्षकांना निवेदन न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज महाराष्ट्र
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
यवतमाळ केअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या नावाने खासगी रुग्णालय येथे कोणतेही सर्जन डॉक्टर उपलब्ध नसताना शस्त्रक्रिया केल्या जात आहे या मुळे एस.टी बस कर्मच्याऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी डॉक्टर वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्या कडे करन्यात आली आहे
बिरसा ब्रिगेड उपाध्यक्ष अक्षय अशोक सिडाम पाटणबोरी तालुका केळापुर संघटना तसेच समस्त आदिवासी संघटना यांच्या वतीने लेखी तक्रार दाखल करन्यात आली आहे .
पाटणबोरी येथील आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा पांढरकवडा आगाराचे एस.टी डेपोमधील बस चालक गजानन यशवंत चांदेकर(३६) राहणार पाटणबोरी यांना यवतमाळ केअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ला १३ जून ला उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांनतर १४ जून ला त्यावर कॅन्सर असल्याचे सांगून डॉ.प्रशांत तामगाडगे,डॉ.सुमित गुरुदे,डॉ चंद्रशेखर भाडे राहणार (नागपूर) यांनि गालाची व मानेची शस्त्रक्रिया केली त्यांनंतर १५ व १६ जून पर्यंत गजानन ची हालचाल बंद होती दरम्यान नातेवाईकांनी उपस्थित डॉ.प्रशांत तामगाडागे तसेच डॉ.सुमेध, अच्युत नरोटे यांना विचारना केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातच हंबरडा फोडला त्यांनतर संतप्त नातेवाईकांनी शस्त्रक्रियेचा धाक दाखवून गजानन वर चुकीचा उपचार करून त्याचा जीव घेतला अशी तक्रार देऊन गजानन याचे शवविश्चेदन केले.या तक्रारी डॉ.प्रशांत तामगाडागे,डॉ.सुमेध गुरूदे,डॉ.चंद्रशेखर भाडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच शवविश्चेदन अहवालाच्या प्राथमिक अहवाला वरून तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांचेकडे केली असून या प्रकरणी औधुतवाडी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक निराळे करीत आहे.मात्र सहा दिवस उलटून अद्यापही शवविश्चेदणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
Comments
Post a Comment