हिंदुस्तान फिडस् व आदित्य दुध संकलन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ढगपिपरी शाळेतील विद्यार्थांना वह्या वाटप

हिंदुस्तान फिडस्  व आदित्य दुध संकलन केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थांना वह्या वाटप

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 

  परंडा  दि.13 )  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढगपिंपरी ता.परंडा येथील 1 ली ते 8 वी च्या एकुण 138 विद्यार्थ्यांना हिंदुस्तान फिडस्, बारामती व आदित्य दुध संकलन केंद्र ढगपिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला 

 हिंदुस्तान फिडस् बारामती या कंपनीच्या CSR निधीमधून विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
 
हिंदुस्तान फिडस् बारामती व आदित्य दुध संकलन केंद्र,ढगपिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.कंपनीने ढगपिंपरी गावातील शेतकरी व दुध उत्पादक कुटुंबातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा निर्णय घेतला 
त्याप्रमाणे आज इयत्ता 1ली व 2 रीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 वह्या,,3 री व 4थीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 वह्या,,5 वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 रजिस्टर्स वाटप करण्यात आले.
 यावेळी हिंदुस्तान फिडस् बारामती चे कर्मचारी, आदित्य दुध संकलन केंद्राचे चेअरमन डाॅ. सोमनाथ (पप्पू) शिंदे,मुख्याध्यापक यशवंतराव पाटील,सहशिक्षक लहु मासाळ,रविंद्र पाटील,दत्तात्रय सोनवणे,बाळासाहेब भंडारे, संगिता ठोंगे, अनिता चिपडे,नम्रता हांडे उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न